Primium|Protein in diet: जिमपासून स्वयंपाकघरापर्यंत फक्त प्रोटीनचीच चर्चा.! भारतीयांच्या आहारात नेमकं काय कमी पडतंय.? नवा अहवाल काय सांगतोय?

Daily Protein Requirement :भारतीयांचा प्रोटीनचा मुख्य स्त्रोत काय आहे, त्यांना पुरेसं प्रोटीन मिळतं आहे का याविषयी १७ नोव्हेंबर रोजी एक अहवाल प्रसिद्ध झाला आहे. त्या अहवालात नेमकं काय म्हटलं आहे जाणून घेऊया सकाळ+ च्या विशेष लेखातून..
protein diet

protein diet

Esakal

Updated on: 

सकाळी नाश्त्याला पोहे खाल्ले, दुपारी दोन पोळ्या, भाजी आणि वरण-भाताचं जेवण झालं. संध्याकाळी चहा-बिस्किटं आणि रात्री पुन्हा पोळी-भाजी, वरण भात. दिवसभराचं जेवण अगदी नेहमीसारखंच! पण या सगळ्या पदार्थांमधून शरीराला किती प्रोटीन मिळालं, याचा विचार कधी केला आहे का?

असला काही विचार करणं हे आतापर्यंत आपल्या गावीच नसायचं. आपल्या आज्या, मावश्या म्हणतात तसं... “कणाकणा खायचं आणि कणाकणा कामं करायची..” पण आता कणाकणा कामं करायचे दिवस राहिलेच नाहीत तर जेवण तरी कसं जाईल. सगळी सिस्टिमच बिघडली आहे. त्यामुळे शरीराला नेमकं काय आणि किती हवंय याची गणितं आता सगळेच मांडू लागलेत. पूर्वी हे 'फॅड’ फक्त पाश्च्यात देशांपुरतं होतं, पण भारतीय लोक देखील आता रोजच्या जेवणातलं प्रोटीन मोजतात.

माझ्या शरीराला किती प्रोटीनची गरज आहे आणि जेवणातनं किती मिळतंय? असा प्रश्न एआयला विचारला की एआय लगेचच सगळी कुंडलीच सांगतं. त्यामुळे भारतीयांनाही आता सवय लागली आहे जेवणातलं प्रोटीन मोजायची. पण खरंच भारतीयांना त्यांना किती प्रोटीन हवं आहे हे माहिती आहे का?, भारतीयांचा प्रोटीनचा मुख्य स्त्रोत काय आहे, त्यांना पुरेसं प्रोटीन मिळतं आहे का याविषयी १७ नोव्हेंबर रोजी एक अहवाल प्रसिद्ध झाला आहे. त्या अहवालात नेमकं काय म्हटलं आहे जाणून घेऊया सकाळ+ च्या विशेष लेखातून..

Loading content, please wait...