
GST cuts
esakal
प्रेम शुक्ला
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ऑगस्ट २०२५ रोजी केलेले भाषण केवळ स्वातंत्र्यदिनाच्या परंपरेचा भाग नव्हते, तर एक नव्या बदलाची सुरुवात होती. मोदींनी जीएसटी सुधारणा जाहीर करून सामान्य माणसांचे जीवन उजळवले. एक जुलै २०१७ हा दिवस देशाच्या आर्थिक इतिहासात आजही सुवर्णाक्षरांनी नोंदलेला आहे. या दिवशी गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स (जीएसटी) लागू होऊन भारताने ‘एक देश, एक
कर,’ हे स्वप्न साकार केले. पूर्वी देशात अनेक प्रकारचे करांचे जाळे अस्तित्वात होते. जीएसटीने हे सर्व एकत्र करून एक पारदर्शक, सोपी आणि तंत्रज्ञानाधारित करव्यवस्थेची पायाभरणी केली. दिवाळी सणाच्या झगमगाटाआधी आणि छठ पूजेच्या पवित्रतेच्या पूर्वसंध्येला जेव्हा संपूर्ण देश परंपरा आणि उत्साहाच्या तयारीत मग्न आहे, तेव्हा मोदी सरकारने असा निर्णय घेतला आहे की जो केवळ अर्थव्यवस्था बळकट करणार नाही, तर प्रत्येक सामान्य कुटुंबात आनंदाची ज्योत पेटेल.