मुंबई: काश्मीरमध्ये भारतीयांवर झालेल्या दहशदवादी हल्ल्याचा बदला म्हणून बुधवारी पहाटे भारताने पाकिस्तानवर ऑपरेशन सिंदूर अंतर्गत हवाई हल्ला केला. त्यानंतर भारतात सर्वत्र भारतीय सैन्याचे कौतुक केले जाते आहे. भारतामध्ये ठिकठिकाणी भारतीय नागरिक जल्लोष करताना दिसत आहेत. पाकिस्तानमधील काही नागरिक सुद्धा भारताचे कौतुक करत असल्याचे देखील व्हिडीओ व्हायरल झाले आहे.
मात्र पाकिस्तानमधील माध्यमे या एकूणच घटनेचं वार्तांकन काही वेगळंच करताना पाकिस्तानमधील जनतेला काहीशी वेगळीच माहिती देत आहेत.
'सकाळ प्लस' च्या माध्यमातून जाणून घेऊया पाकिस्तानमधील काही नामांकित माध्यमांनी नेमके काय वार्तांकन केले आहे? भारतीय माध्यमांमधील वार्तांकनापेक्षा ते कसे वेगळे आहे? तसेच तेथील सामान्य नागरिक आणि सेलिब्रिटी यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे?