child safety at school rules and parent right
Esakal
पुणे - हल्ली कोणत्याच ठिकाणी आपली चिमुकली मुलं सुरक्षित नाही हे अनेक मोठ्या घटनांनी दाखवून दिलं आहे. त्यामुळेच प्रत्येकवेळी व्यवस्थेला जबाबदार ठरविण्यापेक्षाही आता पालकांनीच स्वत: जागरूक रहात मुलांच्या संरक्षणासाठी आवश्यक त्या उपाययोजना करायला हव्यात.
राज्यात आता जून महिन्यात नविन शालेय वर्ष सुरू होणार आहे. त्यासाठी पालक विद्यार्थी शालेय वस्तू खरेदी करण्यात व्यस्त आहेत. पण ही तयारी करत असताना शाळेची सुरक्षेच्या तयारीचीही खात्री करणे आवश्यक आहे.
ज्या शाळांमध्ये आपली मुलं जातायेत तिथं सीसीटीव्ही तर आहे पण ते सीसीटीव्ही चालू स्थितीत आहेत का? आपण मुलांना ज्या ड्रायव्हर काकांच्या हाती सोपवतो त्यांची बॅकराउंड तपासली आहे का? शाळेत जे कर्मचारी काम करतात त्यांच्याविषयी आपल्याला माहिती आहे का? पालक शिक्षक समितीमध्ये आपला सहभाग असतो का? आपण शाळेला प्रश्न विचारतो का? पालक म्हणून आपला अधिकार काय? कायदे काय सांगतात आणि तज्ज्ञांचे मत काय? हे सगळं जाणून घेऊया सकाळ+ च्या विशेष लेखाच्या माध्यमातून...