
मुकुंद लेले
mukund.lele@esakal.com
‘शक्तीविना भक्ती निष्क्रिय, भक्तीविना शक्ती विनाशक’ ही मूळ विचारधारा व्यवस्थित समजून घ्यायला हवी. हे समजून घेतले तरच पुढचा प्रवास आपण योग्य दिशेने करू शकणार आहोत. शक्तीविना भक्ती आणि भक्तीविना शक्ती केवळ अशक्य आहे. या दोघांमधील समतोल नव्या स्वप्नांचा वेध घेण्यासाठी अत्यंत आवश्यक आणि मोलाचा आहे. मी, आम्ही आणि आपण म्हणजेच प्रत्येक व्यक्ती, त्याचे कुटुंब आणि समाज अर्थात जग या सगळ्यांसाठी जर सर्वांगीण उत्कर्ष साधायचा असेल, तर
भक्ती-शक्तीशिवाय अन्य मार्ग नाही. संपूर्ण ‘सकाळ माध्यम समूह’ ही विचारधारा स्वीकारून, समजून घेऊन मार्गक्रमण करत आहे आणि म्हणूनच आमूलाग्र सामाजिक परिवर्तनासाठी ‘भक्ती-शक्ती व्यासपीठ’ उपलब्ध करून दिले जात आहे. ‘सकाळ माध्यम समूहा’चे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार यांच्या पुढाकाराने स्थापन केल्या जात असलेल्या या व्यासपीठाविषयी थेट त्यांच्याशी केलेल्या बातचितीचा हा सारांश.