
प्रत्येकच माणूस ज्याच्या-त्याच्या परीने भरपूर कमवायचा प्रयत्न करत असतो. बचतही प्रत्येक जण करत असतोच. पण प्रत्येकाचीच बचत व्यवस्थित होतेच असं नाही. काही जण एकदम उत्तम पद्धतीने बचत करतात आणि काही मात्र त्यात पद्धतशीर माती खातात. माती खातात म्हणजे करतच नाहीत असं नाही. पण त्यांना ते जमतच नाही!
असंच आपल्या गोष्टीच्या नायकालाही जमत नाहीये. कुठली गोष्ट? कुठला नायक? तर 'खर्चा भाई' हा आपल्या आजच्या गोष्टीचा नायक आहे. हा एक मध्यमवयीन, थकलेला, हरलेला पण अत्यंत खर्च करणारा माणूस आहे बरंका. पण एक मात्र आहे, हा बचत करायचा प्रयत्न करतो(अधून मधून). पण त्याला काही ते जमत नाही.
आता बचत म्हणजे पैसे वाचवणं, हे त्याला कळलंय की नाही कोण जाणे! पण तुम्ही त्याला एकदम नावं ठेऊ नका please! बचत काही सगळे एकसारख्या पद्धतीने करत नाहीत. काही अभ्यासपूर्ण आणि काही नुसतं 'करायची म्हणून' करतात आणि म्हणूनच कितीही प्रयत्न केले तरी ती व्यवस्थित होतंच नाही- जस्ट लाईक आवर खर्चा भाई! मग काय बरं चुकतं त्यांचं बचत करताना? योग्य पद्धतीने कशी करतात बचत? ती करताना काय चुका होतात आणि त्या टाळायच्या कशा? हे सगळं आपण आज 'सकाळ प्लस'च्या या लेखात वाचणार आहोत... तर, एक होता खर्चा भाई...