

Smartphone Buying Guide
esakal
आपण बऱ्याचदा म्हणतो की अमुक फोन सगळ्यात चांगला आहे. किंवा या फोनची किंमत १ लाख रुपये आहे म्हणजे तो सगळ्यांसाठीच चांगला आहे. परंतु प्रत्यक्षात कोणताही एक फोन सर्वांसाठी परफेक्ट असू शकत नाही. म्हणूनच तुम्हाला फोन निवडणं सोपं व्हावं म्हणून आम्ही वेगवेगळ्या गरजांनुसार उत्कृष्ट फोनच्या ५ वेगवेगळ्या कॅटेगरी केल्या आहेत. त्या आधारे तुमची गरज आणि आवड काय आहे, यानुसार तुम्ही तुमच्यासाठी योग्य फोन निवडू शकता.
जसं की पहिली कॅटेगरी १०-१५ हजार किंमतीच्या फोनची.
या कॅटेगरीचा विचार केला तर आज बाजारात अनेक बजेट स्मार्टफोन्स उपलब्ध आहेत. काहींमध्ये चांगला कॅमेरा आहे, पण बॅटरी नाही. काही ठिकाणी बॅटरी मोठी आहे, तर स्टोरेज कमी आहे. तिन्ही गोष्टी असल्या, तरी कमी किंमतीचा फोन असल्यामुळे युजर इंटरफेस चांगला मिळत नाही. या बजेटचा विचार करून अनेक मोबाईलची तुलना केल्यावर Lava Shark 2 5G हा फोन एक उत्तम पर्याय ठरतो, असं आम्हाला आढळलं. Lava चा हा फोन फक्त ११ हजार ९९९ रुपयांत उपलब्ध आहे. शिवाय आता सेलमुळे याची किंमत आणखी कमी होईल. या किमतीत तुम्हाला ६०००mAh बॅटरी, IP64 डस्ट आणि वॉटर रेझिस्टन्स रेटिंग, १TB पर्यंत वाढवता येणारं स्टोरेज आणि मोबाईल बिघडला तर दुरुस्तीसाठी मोफत घरपोच सुविधा या गोष्टी मिळतात.
हे झालं १५ हजार रुपयांखालच्या बजेटचं. पण कोणाला कॅमेरा महत्त्वाचा असतो, कोणाला प्रायव्हसी महत्त्वाची असते, कोणाला फ्लॅगशिप फोन हवा असतो, तर कोणाला गेमिंगसाठी परफॉर्मन्स महत्त्वाचा असतो. मग या वेगवेगळ्या कॅटेगरींसाठी सर्वोत्तम पर्याय कोणते, हे सगळं सविस्तर जाणून घेऊया सकाळ+च्या या लेखातून.