Premium|तुमचा Resume कंपनीपर्यंत पोहोचण्याआधीच रिजेक्ट होतोय? AI Screening मधून पुढे जाण्यासाठी काय करावे?

ATS Friendly Resume: अनेक कंपन्या अर्जांची प्राथमिक छाननी करण्यासाठी Applicant Tracking System आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करतात. त्यामुळे Resume किती छान वाटतो यापेक्षाही त्यातील माहिती किती स्पष्टपणे लिहिली आहे हे महत्त्वाचे..
How AI scan Resume

How AI scan Resume

Esakal

Updated on: 

How to Create an ATS-Friendly Resume in 2026: Tips to Pass AI Screening

पुणे – मी अनेक ठिकाणी अर्ज केला. मागच्या वर्षभरात तर मी किमान ५० तरी ठिकाणी अर्ज केलाय पण पुढे काही घडतंच नाही. ना रिप्लाय येत, ना तुमचा Resume रिजेक्ट झालाय असं साधं कळवलंही जात नाही. नेमकं काय चुकतंय तेच कळत नाही. वयाच्या २६ शीत असणारा विनोद सांगत होता.

नोकरीसाठी अर्ज केला, Resume पाठवला; पण मुलाखतीसाठी फोनच आला नाही, असा अनुभव फक्त विनोदलाच नाही तर अनेकांना येतो. काही जण एकाच वेळी दहा-बारा कंपन्यांमध्ये अर्ज करतात. प्रत्येक वेळी Resume पाठवूनही प्रतिसाद मिळत नसल्याने नेमकी चूक कुठे होते, असा प्रश्न त्यांना पडतो. उमेदवाराचा अनुभव कमी असणे किंवा पात्रता न जुळणे ही त्यामागची कारणे असू शकतात. मात्र आता भरती प्रक्रियेत आणखी एका गोष्टीची भर पडली आहे. ती म्हणजे AI आधारित Resume Screening. अनेक कंपन्या अर्जांची प्राथमिक छाननी करण्यासाठी Applicant Tracking System  आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करत आहेत. त्यामुळे उमेदवाराचा Resume किती छान वाटतो यापेक्षाही त्यातील माहिती किती स्पष्टपणे लिहिली आहे, कंपनीच्या गरजांशी किती जुळते, या गोष्टींना आता अधिक महत्त्व आले आहे.

त्यामुळेच AI आपला Resume का बाद करते हे समजून घ्यायचे असेल तर ATS सारख्या सिस्टिम काम कशा करतात हे समजून घेणं गरजेचं आहे. Resume मध्ये कोणत्या चुका टाळायला हव्यात, डेटा काय सांगतो, AI Screening मधून पुढे जाण्यासाठी Resume मध्ये नेमके काय बदल करायला हवेत? अशी सगळी माहिती सकाळ+ च्या या विशेष लेखाच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करूया..

Loading content, please wait...