

Unified Unclaimed Financial Assets Portal: Check Forgotten Investments and Claims Online
E sakal
Unclaimed Money in India: How to Find Bank Deposits, Insurance & Mutual Funds Through the New Portal
सुधाकर कुलकर्णी
sbkulkarni.pune@gmail.com
देशभरातील बँका, विमा कंपन्या, म्युच्युअल फंड संस्था आणि कंपन्यांकडे एक लाख कोटी रुपयांहून अधिक विनादावा आर्थिक रक्कम अडकून पडली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने ‘युनिफाइड पोर्टल फॉर अनक्लेम्ड फायनान्शियल ॲसेट्स’ नावाने नवे पोर्टल सुरू केले असून, नागरिकांना आता एकाच ठिकाणी अशा ठेवी, विमा दावे, शेअर, लाभांश आणि म्युच्युअल फंड गुंतवणुकीचा शोध घेणे शक्य होणार आहे.
देशातील विविध बँका, विमा कंपन्या, म्युच्युअल फंड संस्था; तसेच कंपन्यांकडे नागरिकांची मोठ्या प्रमाणावर आर्थिक रक्कम वर्षानुवर्षे विनादावा (अनक्लेम्ड) स्वरूपात पडून असल्याचे दिसून येते. सरकारी आकडेवारीनुसार, अशा विनादावा रकमेचा आकडा एक लाख कोटी रुपयांहून अधिक आहे. यामध्ये बँकांमधील सुमारे ७८ हजार कोटी रुपये, विमा कंपन्यांकडे सुमारे १४ हजार कोटी रुपये, म्युच्युअल फंडांमध्ये सुमारे तीन हजार कोटी रुपये आणि लाभांशाच्या स्वरूपात सुमारे नऊ हजार कोटी रुपये अडकून पडले आहेत.