
भूषण महाजन
भारताच्या शाश्वत भविष्यासाठी ईव्ही आणि अक्षय ऊर्जा क्षेत्रे महत्त्वाची आहेत, परंतु निवड चोखंदळ हवी! एक गुंतवणूकदार म्हणून धडा सोपा आहे - उदयोन्मुख क्षेत्राच्या आश्वासनाने हुरळून जाऊ नका. शेअर बाजारातील रोमांचक कथेमागील सत्य जमेल तितके तपासा आणि थोडी जरी शंका आली तरी दूर राहा.
आपली भेट एक सप्ताहाच्या विश्रांतीनंतर होत आहे. दरम्यानच्या काळात बरेच पाणी सिंधू-सतलज-चिनाबमधून वाहून गेले. पहलगामचे उत्तर देताना भारताने पूर्ण तयारीने पाकिस्तानने बळकावलेल्या काश्मीरमधील अतिरेक्यांचे अड्डे उडवून किमान शंभर दशहतवाद्यांना कंठस्नान घातले, पुढेही शत्रूचे भरपूर नुकसान केले.