
डॉ. वीरेंद्र ताटके
tatakevv@yahoo.com
शेअर बाजारात चढ-उतार होतच राहतात. बाजार घसरल्यास आपण गुंतवणूक केलेल्या शेअरचा भाव कमी होऊन नुकसान होते; मात्र जिच्या शेअरचा बाजारभाव कमी झाला आहे, त्या कंपनीचे मूलभूत गुणधर्म चांगले असतील, तर तोट्याची सरासरी कमी करण्यासाठी पडलेल्या बाजारभावात आणखी शेअरची खरेदी करणे श्रेयस्कर ठरू शकते. कसे ते जाणून घेऊ या.
अनिकेत : नमस्कार सर! येऊ का?
शिक्षक : अरे ये ये. आज अचानक कसा काय? आणि एवढा नाराज का दिसतो आहेस?