Parenting Guilt: आपण आई-बाबा म्हणून कमी पडतोय का..?

Positive Parenting: प्रत्येक टप्प्यातील मुलांच्या पालकांच्या मनात अशी भावना येत असते. त्यांना खरोखरच हा निष्काळजीपणा आहे, आपण मुलांना गृहीत धरतोय का? आपल्या चुकीच्या वागण्याने मुलांवर वाईट परिणाम होईल का? असा वेगवेगळ्या भावना मनात येत असतात..
parenting guilt
parenting guilt Esakal
Updated on

(Marathi article on what is parenting guilt and how to overcome from that guilt?)

मुंबई : माझं हल्ली माझ्या मुलीकडे एवढं दुर्लक्ष होतंय ना.. काय चाललंय माझं मलाच कळेना..

असे प्रश्न पालक म्हणून तुमच्याही मनात येतात का..?

संपदा.. पाच वर्षाच्या धैर्यची आई. सांगत होती.. मी नुकतीच माझी नोकरी बाळंतपणानंतर पुन्हा सुरु केली आहे आणि माझ्या मुलाला थोडा वेळ शाळेत आणि उरलेला वेळ सासूबाईंकडे ठेवते. खरंतर मी व्यवस्थित नियोजन करून या सगळ्या गोष्टी ठरविल्या होत्या. यातून मुलाला किती वेळ द्यायचा, स्वतःला किती वेळ द्यायचा? कुटुंबासाठी किती वेळ द्यायचा याचं छान नियोजन देखील केलं होतं. सुरुवातीचे काही दिवस ते छान पाळलं देखील... पण हल्ली हल्ली सगळ्या गोष्टी कळून सुद्धा तशा वळत नाहीत.

म्हणजे मला माहिती असतं की मला धैर्यचा अभ्यास घ्यायचा आहे पण मी कंटाळा करते.. किंवा खरं तर आमच्या आधी रोज खूप गप्पा व्हायच्या त्या हल्ली होत नाहीत. यामध्ये तो मित्रांमध्ये जास्त रमला आहे म्हणून की.. मी आई म्हणून कुठे मागे पडले म्हणून... आमच्या या गप्पा कमी झाल्यात.. त्याच्यातला हट्टीपणा वाढलाय..

घरापासून लांब राहणारा प्रसाद म्हणाला.. परवा मी मित्रांसोबत जेवायला गेलो होतो जेवतानाच माझ्या मुलाचा मला फोन आला आणि "बाबा फक्त दोन मिनिट व्हिडीओ कॉल वर बोल ना.." असं तो तीन वर्षाचा मुलगा म्हणत होता.. पण मी नाही केला फोन..

असं का होत असावं..? पालक म्हणून मी चुकलो का..? मी माझ्या बायकोला आणि मुलाला गृहीत धरतोय का..? असा प्रश्न प्रसादला देखील पडला.

प्रत्येक टप्प्यातील मुलांच्या पालकांच्या मनात अशी भावना येत असते. त्यांना खरोखरच हा निष्काळजीपणा आहे, आपण मुलांना गृहीत धरतोय का? आपल्या चुकीच्या वागण्याने मुलांवर वाईट परिणाम होईल का? आपण बाबा म्हणून आई म्हणून कमी पडतोय का? असा वेगवेगळ्या भावना मनात येत असतात..

'पॅरेंटिंग गिल्ट' हा तर शाळांच्या अनेक ग्रुपवर हमखास चर्चिला जाणारा प्रश्न... अशा गोष्टी पालक फक्त एकमेकांशी बोलून एकमेकांकडे भावना व्यक्त करतात.. पण हा गुंता कोणालाच नीटपणे सोडवता येत नाही. यावर उत्तर मात्र मिळत नाही..

याबद्दल काही संशोधन झालंय का..? यातील तज्ज्ञ अशा परिस्थितीत कसं वागण्याचा सल्ला देतात..? पालकत्वाविषयी लिहिलेल्या पुस्तकांत याबाबत काही मार्गदर्शन करण्यात आलंय का..? आणि अशा परिस्थितीत मी पालक म्हणून कसं वागू,.. हे समजून घेण्याचा प्रयत्न या 'सकाळ प्लस' च्या लेखाच्या माध्यमातून करूया..

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com