
स्वप्ना साने
चेहऱ्याची जशी निगा राखली जाते, तशीच हातांचीही निगा राखायला हवी. चेहऱ्याला लावायचे क्रीम हाताला लावून चालणार नाही. अतिरुक्षपणा असेल तर जास्त नरीशिंग आणि हायड्रेटिंग हँड क्रीमचा वापर करावा.
सुंदर, सुदृढ, टवटवीत त्वचा प्रत्येकालाच हवी असते. त्यासाठी आपण बरेच प्रॉडक्ट्सही वापरत असतो, तर काहीजण ट्रिटमेंटसुद्धा घेतात. पण बहुतांश महिला, आणि पुरुषसुद्धा, सुंदर त्वचा म्हटल्यावर फक्त चेहऱ्याच्या त्वचेकडे लक्ष देतात असे लक्षात येते.
चेहरा टॅन फ्री हवा, पिगमेंटशन नको, सुरकुत्या नकोत, चेहरा टवटवीत दिसावा ह्यासाठी सगळेजण प्रयत्न करत असतात. त्यामुळे शरीराचे बाकी अवयव मात्र दुर्लक्षितच राहतात. आपल्या शरीराचे असे ‘दुर्लक्षित’ अवयव म्हणजे मान, गळा, हात, काखा, पाठ, गुडघे आणि पावले. काही टिप्स नियमित फॉलो केल्यास संपूर्ण शरीराची त्वचा टवटवीत, हेल्दी दिसेल.