पुणे: १३ वर्षांचा मुलगा आणि १२ वर्षांची मुलगी सोसायटीच्या गच्चीवर संध्याकाळी एकांतात बसले होते. ही गोष्ट सोसायटीच्या काकांना समजली. यानंतर काय घडलं असेल? सोसायटीच्या मीटिंगमध्ये गच्चीला टाळं ठोकण्याचा फतवा काढण्यात आला आणि पुढचे सात दिवस सोसायटीत त्याचीच चर्चा सुरू होती.. पण ही परिस्थिती खरंच अशी हाताळली पाहिजे होती का?
हल्ली स्मार्टफोनमुळे मुलांना सगळ्या प्रश्नांची उत्तरं एका टॅपवर मिळू शकतात. मुलांचा आवाज बदलत असतो, त्यांच्या शरीरातील वेगवेगळ्या भागांचे आकार वाढत असतात, त्यांच्यात मोठ्या प्रमाणात हार्मोनल चेंजेस होत असतात, त्यांना शरीर या विषयात रस निर्माण झालेला असतो, प्रेम नातेसंबंध जोडण्याची इच्छा होत असते..
या सगळ्या गोष्टी होत असताना त्यांना स्वतःविषयीच कुतूहल निर्माण झालेले असते, त्यातून त्यांना नव्याने प्रश्न पडत असतात.. पण असा एखादा प्रसंग घडतो तेव्हा पालक जागे होतात. याऐवजी मुलांशी संवाद असेल तर असे प्रसंग टाळता येतील. शाळांमधून लैंगिक शिक्षणासाठी मार्गदर्शन देखील मिळालेलं असतं पण हा पालक आणि मुलगा संवाद तितका सहज सोपा नसतो... तसाच तो शंभर टक्के प्रश्न सोडविणारा ठरत नाही अशा वेळी मुलांचे हे भावविश्व कसे समजावून घ्यायचे..? जाणून घेऊया 'सकाळ प्लस' च्या विशेष लेखातून...