
दिलीप घाटे
dilipghate2@gmail.com
‘होम इक्विटी’ हा एक उत्पन्नाचा स्रोत आहे. होम इक्विटी म्हणजे तुमच्या घराची किंमत आणि गृहकर्जाची शिल्लक रक्कम यातील फरक. समजा तुमच्या घराची किंमत एक कोटी रुपये आहे आणि तुमच्या गृहकर्जाची शिल्लक रक्कम २० लाख रुपये, तर तुमची होम इक्विटी ८० लाख रुपये आहे. घरातील इक्विटीचे प्रमाण कालांतराने वाढू शकते, कारण तुम्ही पेमेंट करता आणि मालमत्तेचे मूल्य वाढते. अधिक तांत्रिकदृष्ट्या, होम इक्विटी हे मालमत्तेचे वर्तमान बाजारमूल्य वजा कोणतेही तारणाधिकार (Lien) आहे, जसे की गहाण, जे त्या मालमत्तेशी संलग्न आहे.