Premium|HPV Vaccination in India : गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाविरुद्ध एचपीव्ही लस: देशात यश, महाराष्ट्राचा आकडा चिंतेचा

HPV Vaccination in India : देशभरात एचपीव्ही लसीकरण मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत असताना महाराष्ट्रात उद्दिष्टाच्या तुलनेत केवळ नऊ टक्के मुलींचे लसीकरण झाले आहे. राज्यातील कमी प्रतिसादामागची कारणे आणि प्रत्येक पात्र मुलीपर्यंत लस पोहोचवण्याची गरज महत्त्वाची ठरत आहे.
HPV Vaccination in India

HPV Vaccination in India

esakal

Updated on: 

गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग होण्याचा धोका कमी करण्यासाठी देशभरात एचपीव्ही लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेत आतापर्यंत एक कोटी लसींच्या मात्रा देण्यात आल्या आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने २१ नोव्हेंबर २०२६ रोजी दिलेल्या माहितीनुसार, दरवर्षी लसीकरणासाठी ठरवलेल्या सुमारे १.२ कोटी मुलींपैकी जवळपास ८७ टक्के मुलींना लस देण्यात आली आहे. मात्र महाराष्ट्रात परिस्थिती वेगळी आहे. १४ ऑक्टोबरपर्यंतच्या आकडेवारीनुसार, राज्यातील ठरवलेल्या उद्दिष्टापैकी केवळ नऊ टक्के मुलींचेच लसीकरण झाले होते. देशभरात या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत असताना महाराष्ट्रात लसीकरणाचा वेग कमी का आहे? तसेच, राज्यातील प्रत्येक पात्र मुलीपर्यंत ही लस पोहोचवण्यासाठी आणखी काय करावे लागेल? हे प्रश्न महत्त्वाचे आहेत.

एचपीव्ही संसर्ग आणि कर्करोगाचा संबंध

एचपीव्ही म्हणजे ह्युमन पॅपिलोमा व्हायरस. या विषाणूचे २०० हून अधिक प्रकार आहेत. त्यापैकी काही प्रकारांमुळे गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग होऊ शकतो. मात्र एचपीव्हीचा संसर्ग झाला म्हणजे महिलेला कर्करोग होतोच, असे नाही. बहुतेक वेळा शरीराची रोगप्रतिकारशक्ती या विषाणूचा संसर्ग स्वतःहून दूर करते.

मात्र काही धोकादायक प्रकारच्या विषाणूंचा संसर्ग शरीरात बराच काळ राहिला, तर गर्भाशयाच्या मुखातील पेशींमध्ये बदल होऊ शकतात. या बदलांचे वेळीच निदान झाले आणि उपचार मिळाले नाहीत, तर पुढे कर्करोग होण्याची शक्यता असते. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, या पेशींचे कर्करोगात रूपांतर होण्यासाठी साधारणपणे १५ ते २० वर्षे लागू शकतात. मात्र ज्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी आहे, अशा व्यक्तींमध्ये हा कालावधी कमी असू शकतो.

त्यामुळे गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचा धोका कमी करण्यासाठी लस घेण्याबरोबरच वेळोवेळी तपासणी करणेही गरजेचे आहे.

Loading content, please wait...