Premium|Hridaynath Mangeshkar : पिंपळपानांची भयप्रद सळसळ, त्यात थंडीची लाट....

Marathi Literature : गोव्याच्या रात्रीतील गुढ थरार, चकव्याचा जीवघेणा अनुभव आणि संगीताच्या सुरांनी उजळलेला अंधार; पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या चिंतनशील लेखणीतून साकारलेला हा एक अस्वस्थ करणारा तरीही चैतन्यमयी आत्मसंवाद वाचकांना खिळवून ठेवतो.
Hridaynath Mangeshkar

Hridaynath Mangeshkar

esakal

Updated on

हृदयनाथ मंगेशकर

मी पिंपळाच्या झाडाजवळ गेलो. पण ते

पिंपळाचे खुणेचे झाड नव्हतेच. ते मघाचे

आंब्याचे झाड होते. म्हणजे गेले दोन तास

मी त्या दोन आंब्याच्या झाडांभोवती फेऱ्या

मारतोय, काय म्हणावे या स्थितीला?

भूत, पिशाच्च, मुंजा, हडळ की चकवा?

नाही हे सारे मिथ्या आहे. भूत वगैरे काही नसते.

भुताला अस्तित्व नसतेच,

भीतीला मात्र सनातन, प्राचीन भयदेह असतो.

मी त्या दोन आंब्याच्या झाडांमधोमध

उभा होतो. पण पानांची सळसळ ऐकून

मी हे पिंपळाचे खुणेचे झाड आहे, असे

समजून येथे दुसऱ्यांदा आलो होतो.

पण आता सारे वातावरण शांत होते,

वारा पडला होता. रातपाखरे आणि

रातकिडे गाऊन, गाऊन थकून झोपी गेली

होती. सर्व शांत आणि सामान्य होत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com