

Hridaynath Mangeshkar
esakal
गुरुजींच्या घरी पोहोचलेले मास्टर दीनानाथ गुरुजींबरोबर गाऊ लागले. काय घडले, त्या दिवशी? रात्रीपासून उपाशी असलेले गुरुजी, त्यात त्यांचे वय झालेले, पण दोघे गाऊ लागले आणि चमत्कार घडला... तो सारा प्रसंग सांगत आहेत पंडित हृदयनाथ आजच्या भागात.
गुरुजी आपल्या आसनावरून उठले.
आणि माझा धरत गहिवरून म्हणाले,
‘‘वाहवा दीना ! आज मी धन्य झालो.
तू माझा शिष्य, दीना ! तुला आज साक्षात
बसंत रागाने दर्शन दिले, अरे ! एका रागाच्या
सुरावटीचा साक्षात्कार म्हणजे...
‘‘ते श्री शारदा विश्वमोहिनीचा साक्षात्कार’’
दीना ! माझ्या लक्षात आलंय तू
स्वप्नरंजनात हरपतोस, हरवतोस, विखरतोस,
तुला राग बसंत ऐकून साक्षात् वृंदावनातल्या
रासक्रीडेचे दर्शन झाले, तू देहाने मंगेशीला
होतास, पण तुझ्या संवेदनशील मनाने
तुला वृंदावनातल्या रासक्रीडेत सदेह नेले
होते. तो कदंब वृक्ष, छाया, नव्हे छैंया.
यमुनेच झुळझुळणे पौर्णिमेचे चांदिणे.
पाजेबचे मेंदीने माखलेले पदरव, ध्वनी.
सारे वातावरण घनु वाजे घुणघुणा
वारा वाहे रुणझुणा या विरहिणीने
भारावलेले आणि त्यात श्रीकृष्णाची बासुरी,
आणि त्या बासुरीच्या स्वराला टेकून बसलेली