Premium|Hridaynath Mangeshkar on Asha Bhosle : दुष्काळ, संघर्ष आणि बहिणीचा आधार; आशा भोसले यांचा भावनिक जीवनपट

Asha Bhosle Childhood Struggles : दुष्काळ, उपासमार आणि संघर्षमय बालपणाच्या आठवणींमधून पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी आशा भोसले यांच्या त्याग, माया आणि कुटुंबासाठीच्या झगड्याचा भावस्पर्शी पट उलगडला.
Asha Bhosle Childhood Struggles

Asha Bhosle Childhood Struggles

esakal

Updated on

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या निधनानंतर पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी अत्यंत आजारी असतानाही आपल्या बहिणीबरोबरच्या आठवणींचा हृद्यपट ‘सप्तरंग’च्या वाचकांसमोर उलगडला होता. (१८ आणि २६ एप्रिल) आता येत्या २५ जूनला पुण्यात ते आशाताईंच्या आठवणी आणि गाणी यासंबंधीचा खास कार्यक्रम पुण्यामध्येे करत आहेत. त्यानिमित्ताने आणि पंडितजींच्या क्रमशः लेखमालेचा हा पुढचा भाग...

स्वच्छ सारवलेली ओसरी, समोर रिकामं

अंगण, तेही सारवलेलं, स्वच्छ झाडलेलं.

गडद पिवळ्या रंगाला किंचित काळसर झाक

दिली की हिरवट, घाऱ्या डोळियांची दिठी

कशी लकाकते, तसे अंगण अनाम रंगाने

लखलखलेले, पण शुष्क, कोरडे, आटलेल्या

नदीच्या पात्रासारखे रुंदावलेले,

विषण्ण, विदीर्ण, उदासवाणं,

सासरी निघालेल्या नववधूच्या पदरासारखं,

माहेराला पारखे झाल्यासारखं,

बावरलेलं, हरपलेलं, धास्तावलेलं...

उजव्या हाताला हिरव्यागार पानांनी ओथंबून

जाणारा पिंपळवृक्ष, उंच, भरलेल्या अंगाचा,

सळसळणाऱ्या नादाचा, स्वत:भोवती

गोल, गोल फिरणाऱ्या पानांचा, त्याच्या

सावलीत हरवलेली एक काळी विहीर.

तप्त, शुष्क, निर्मम जमिनीने एकच डोळा

उघडल्यासारखी निर्विकार, खोलच खोल.

ओसरीच्या उजव्या हाताला एक माणूस

सहज उतरून जाईल इतकी मोठी खिडकी,

त्या खिडकीतून, मातीच्या धुरकट आकृतीसारखी

दिसणारी, छपरावर मुद्दाम बियाणे

टाकून उगविलेल्या गवताच्या रंगाने, उन्हाने

सुकल्यामुळे, पिवळी टोपी घातल्यागत

भासणारी, पण दारिद्र्याने मान टाकलेली, हताश

पंधरा-वीस धाब्याची घरं. तप्त उन्हाने मृगतृष्णेची

निर्मिती झाल्यामुळे त्या मृगजळात बुडतील अशी

भासणारी.

त्या तप्त, शुष्क, पण स्वच्छ अंगणाला सुबक

पत्र्याचं कुंपण आणि त्या कुंपणापलीकडे

दगडधोंड्यांनी सुकलेल्या झाडाझुडपांनी

भरलेला एक अस्ताविस्त उकिरडा.

गरम वारा, तप्प फुपाटा उडवीत, मैदानाला

सजवित, गरमीचा प्रचार करीत हुंडारतोय.

तप्त पाचोळा बेमुर्वत उधळतोय. आश्चर्य

मात्र वारियाची लावण्यमय मंजुळी, मंद मंजूळ तान

झुंजाळणतेय. पण गावमन, गावभान, मान मोडून

हताश पडल्यागत भासतंय.

सारे वातावरण खिन्न, निराश, उदास.

आज उदास उदास दूर, पांगल्या सावल्या

एकांताच्या पारावर, हिरमुसल्या डहाळ्या

काही केल्या करमेना, कसा जीवच लागेना

बोल घेवडी साळुंकी कसा शब्दही बोलेना

असा रुतला पुढ्यात भाव, रुखा जीवघेणा

अशा वातावरणात आशाताई मला मांडीवर

घेऊन भिंतीला टेकून बसली होती.

शेजारी उषाताई, माई, ताईबाई (आजी)

बसली होती. साऱ्यांचे चेहरे बापुडवाणे झाले

होते. दोन दिवस झाले, पीठ नाही, तेल नाही,

तिखट नाही, कांदा नाही. साऱ्यांचे चेहरे भुकेने

व्याकुळले होते.

पीक करपलं पक्षी दूर गेलं

गळणाऱ्या झाडांसाठी मन ओथंबलं

तेवढ्यात आशाताई आईला कावलेल्या

आवाजात म्हणाली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com