

Hrudaynath Mangeshkar
esakal
जिथून तुम्हाला सत्य सापडेल,
तिथून मला निरोप धाडा,
असे पुटपुटत मालक त्या फाटक्या
सतरंजीवर शांतपणे झोपी गेले.
दोन दिवसांनी आपण सारे सांगलीला,
आपल्या मालकीच्या, घरात पोहचलो.
पण आपण पोहोचण्यापूर्वीच कंपनीचा
लिलाव झाला, ही बातमी,
सांगली गावात येऊन पोहोचली होती.
सकाळ झाली. पहिले दर्शन झाले ते
वाण्याचे, मग परिटाचे, मग शिंप्याचे.
मग सारे देणेदार गोळा झाले. सुतार, रंगारी.
मग कंपनीचे उरलेले नोकर, सारे एकमुखी
पैसे मागू लागले. मालकांनी शांतपणे पण
सूचक नजरेने माझ्याकडे पाहिले. त्यांना
माहीत होते, की मी त्यांच्या नकळत पैसे
साठवते. मी पण शांतपणे उठले, तिजोरीत
लपवून ठेवलेले, सारे पैसे मालकांच्या हाती
दिले. मालकांनी तो नोटांचा जुडगा, गणपत
मोहिते यांच्या हाती दिला.
निरीच्छेने म्हणाले.