
हृदयनाथ मंगेशकर
kunteshreeram@gmail.com
मा. दीनानाथ मंगेशकर यांना नाटक कंपनी नव्याने उभी करायची होती. त्यासाठी ते सोलापूरला एका उद्योगपतींकडे गेले. हे उद्योगपती त्यांचे चाहतेच होते. घरगुती संबंध असलेल्या या उद्योगपतीने त्यांना अर्थसहाय्य करण्यापूर्वी काही मुद्दे उपस्थित केले, त्यामुळे दीनानाथ यांचे मन दुखावले आणि त्यांच्या मनाची अवस्था वेगळीच झाली. त्या साऱ्या कालखंडाला उजाळा देत आहेत ज्येष्ठ संगीतकार हृदयनाथ मंगेशकर...
न गुल-ए-नग्मा हूँ, न पर्दा-ए-साज मैं हूँ अपनी शिकस्त की आवाज
‘‘कोहम्? मी कोण आहे? मी सुमधुर
गीतांचा गुलदस्ता नाही की एखाद्या
वाद्यातून निघणारा. सुरेल सूरही नाही.
मी फक्त माझ्या असफलतेचा, पराजयाचा
एक करुण ध्वनी आहे, हीच माझी ओळख."