Pecking order
Pecking orderesakal

Human Leadership: अल्फा मेल ही संकल्पना आज फक्त बलवानतेशी जोडली जाते. तिला जबाबदारी, सहकार्य आणि नैतिकतेशी जोडणे आवश्यक आहे

Alpha Male: माणसाचे नेतृत्व सुरुवातीला शारीरिक ताकद, धैर्य आणि निर्णयक्षमतेवर आधारित होते. आधुनिक काळात ते भाषा, बुद्धिमत्ता, न्याय आणि संस्कृतीवर आधारित झाले आहे
Published on

राहुल गडपाले

rahulgadpale@gmail.com

आजच्या माणसाचे नेतृत्व पाहिले तर त्याच्यात आणि प्राण्यांमध्ये फारसा फरक जाणवत नाही. नेतृत्वातून सत्ता मिळाल्यानंतर प्राणी शिकारीवर आणि इंद्रियांच्या सुखावर समाधान मानतात. आता माणूसही त्याच पंगतीत बसायला लागला आहे. सत्ता आली, की तो स्वैर होतो. आता त्याच्या नेतृत्वगुणांचा उलटा प्रवास सुरू आहे. न्यायाकडून अन्यायाकडे, सत्याकडून असत्याकडे, नैतिकतेकडून अनैतिकतेकडे, सहकार्यातून असहकाराकडे तो माघारी जातोय. कारण सत्तेचे नशाबाज प्रलोभन त्याच्या माणूसपणाचा घात करतेय.

माणूस असो अथवा प्राणी प्रत्येकाला आपल्या समूहावर वर्चस्व हवे असते. त्यासाठी करावा लागणारा संघर्ष कितीही तिरस्करणीय असला तरी त्यातून मिळणाऱ्या वर्चस्वाची चव चाखण्यासाठी प्राणी वाट्टेल ती परीक्षा द्यायला तयार असतात. त्यामुळे प्रसंगी स्वतःचे किंवा आपल्या समूहातील इतरांचे प्राण संकटात येऊ शकतील, याचाही विचार ते करत नाहीत. कारण सत्ता हे एक प्रकारचे नशाबाज प्रलोभन असते. ते मिळवण्यासाठी प्राणी कुठल्याही पातळीवर उतरतो. एकदा का ते मिळवले, की मग ते टिकवण्याची होड सुरू होते. त्यातून संघर्ष वाढत जातो; पण हा गुण केवळ माणसातच आहे, असे मुळीच नाही. प्राणीही कायम आपल्या कळपाची सत्ता गाजवण्याचा प्रयत्न करत असतात.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com