

Child Trafficking
esakal
आधुनिक काळातील ‘गुलामगिरी’चं एक भयानक स्वरूप म्हणजे ‘मानवी तस्करी’. मादक द्रव्य आणि शस्त्रास्त्रांच्या अनधिकृत व्यापारानंतर जागतिक गुन्हेगारी क्षेत्रात मानवी तस्करी हा अफाट अनधिकृत नफा मिळवून देणारा तिसऱ्या क्रमांकाचा गुन्हा आहे. आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेच्या (ILO) मार्च २०२४ मध्ये प्रकाशित झालेल्या अहवालानुसार, २०१४ मध्ये केलेल्या सर्वेक्षणातून समोर आलेल्या आकडेवारीच्या (१५० अब्ज अमेरिकन डॉलर्स) तुलनेत, वेठबिगारी आणि लैंगिक शोषणामधून मिळणाऱ्या अनधिकृत नफ्याचा आकडा वर्षाला जवळपास २३६ अब्ज अमेरिकन डॉलर्स इतका पोहोचला आहे. त्यावरून मानवी तस्करीच्या गुन्ह्याचं गांभीर्य आपल्या लक्षात येईल.