पुणे: इटलीच्या ‘Il Foglio’ यांनी जगातील पहिलं पूर्णतः कृत्रिम बुद्धिमत्तेने म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून वृत्तपत्र छापलं आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स कसे काम करते? त्याचा आपल्या दैनंदिन आयुष्यावर कसा परिणाम होतो हे जाणून घेण्यासाठी या वृत्तपत्राचे संपादक क्लॉडिओ सेरासा यांनी हा प्रयोग करायचे ठरवले. या अंतर्गत त्यांनी ‘Il Foglio AI’ नावाचा चार पानांचा अंक पूर्णपणे AI च्या साहाय्याने तयार केला.
AI च्या माध्यमातून संपूर्ण वृत्तपत्र काढण्याचा हा त्यांचा प्रवास कसा होता? हे करत असताना त्यांना काय अनुभव आला? यावर वाचकांचे काय मत होते? या प्रयोगाने आता जगभरातील पत्रकारांच्या नोकऱ्या धोक्यात आल्यात का? या वृत्तपत्रात काम करणाऱ्या पत्रकारांचे काय म्हणणे आहे? या सगळ्या गोष्टी जाणून घेऊया 'सकाळ प्लस' च्या या विशेष लेखातून...