
डॉ. सतीश करंडे
आपल्याकडे दहा-पंधरा वर्षांपूर्वी हवामान बदल, ‘ग्लोबल वॉर्मिंग’ची चर्चा सुरू झाली. त्याचे दुष्परिणाम म्हणजे तापमानवाढ होईल, हिमनद्या वितळतील, समुद्राची पातळी वाढेल, तीव्र किंवा कमी पाऊस, चक्रीवादळे होतील असे सांगितले जात होते. सर्वसामान्यांना हे कुठे तरी जगामध्ये होणार आहे असे वाटत होते. परंतु मागील पाच वर्षांपासून हवामानबदलाची समस्या (तापमानवाढ, मोठा पाऊस, दुष्काळ, गारपीट, रोगराई) सर्वांना जाणवत आहे.