Detergent Industry
Detergent IndustrySakal

कोरोनाचा परिणाम: डिटर्जन्टस आणि वाढती महागाई; कोण फायद्यात कोण तोट्यात?

वर्ष २०२० ! हे वर्ष आपल्या सर्वांच्याच आयुष्यात एक वेगळं वळण घेऊन येणारं ठरलं. अर्थात याचं कारण म्हणजे कोरोना. जगभरात कोरोना पसरल्यानंतर आपल्या आयुष्यातील अनेक गोष्टी बदलल्यात. यामध्ये आपलं राहणीमान, आपली काम करण्याची पद्धत, आपल्या सवयी, आपलं जेवण खवणं; अशा एक ना अनेक गोष्टी बदलल्यात.

यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपली स्वच्छता आणि आणि सफाई. कोरोना आल्यापासून आपण नियमित हात धुवायला तर लागलोच, सोबतच आपले कपडे, आपलं घर, आपल्या आसपासचा परिसर, सारख्या हात लागणाऱ्या गोष्टी किंवा सार्वजनिक ठिकाणांवरच्या सर्वांचा स्पर्श होणाऱ्या सगळ्या गोष्टी वारंवार स्वच्छ देखील करायला लायलो. अनेकदा आपण असं मजेत म्हणतो देखील, "अरे, लॉकडाऊनमध्ये कुणी साबणाचा किंवा डिटर्जंटचा धंदा सुरु केला असेल, त्याचा धंदा तर एकदम तेजीत नफा कमावून देत असेल." आज या लेखाच्या माध्यमातून आपण जगभरातील डिटर्जंट व्यवसायाबद्दल, या व्यवसायाच्या परिस्थितीबाबत, येणाऱ्या काळात हा व्यवसाय कुठंवर जाऊ शकतो, या महत्त्वाच्या गोष्टींवर सखोल टाकणार आहोत.

डिटर्जंट मार्केट सध्या कमालीच्या दबावाखाली

भारतीय डिटर्जंट मार्केट सध्या कमालीच्या दबावाखाली काम करताना पाहायला मिळतंय. याला कारण म्हणजे सातत्याने वाढणाऱ्या कच्या मालाच्या किमती आणि त्यामुळे सातत्याने कमी होणारं ऑपरेटिंग मार्जिन.

कोरोनामुळे सध्या डिटर्जंट, लिक्विड सोप, इंडस्ट्रियल क्लीन्झर्स आणि सॅनिटायझर्सची मागणी कमालीची वाढली आहे. यापैकी जवळजवळ प्रत्येक गोष्ट बनवण्यासाठी एक खास केमिकल लागतं. ज्यामध्ये बेन्झिनचा वापर केला जातो. एकीकडे अल्कल बेन्झिन (Alkyl Benzene) च्या किमती वाढतायत, सोबतच (Sulphonic Acid) लिनिअर अल्कल बेन्झिन सल्फोनिक ऍसिडच्या किमती देखील जागतिक बाजारपेठेत गेल्या काही आठवड्यांपासून सातत्याने वाढतायत. त्यामुळे कोरोनामुळे वाढणारी मागणी आणि सातत्याने वाढणाऱ्या किमतींमुळे कमी होणारा पुरवठा अशी परिस्थिती सध्या पाहायला मिळते आहे.

detergents
detergentssakal
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com