
सम्राट फडणीस
मुंबई-पुण्यासह राज्यातील सर्वच शहरांना गुन्हेगारीचे ग्रहण लागले आहे. अडीच दशकांत जमिनींचे व्यवहार, पायाभूत सुविधांचे कंत्राटदार आणि उद्योग या तीन क्षेत्रांना गुंडगिरीची अधिक लागण झाली आहे. या काळात राजकारण, गुंडगिरी यांच्यातील सीमारेषा पुसत गेल्या आहेत. गुन्हेगारीचा हा विळखा सोडविण्यासाठी सर्वसमावेशक धोरणांची गरज आहे.