मेजर जनरल संजीव डोगरा (निवृत्त)
saptrang@esakal.com
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी बेछूट गोळीबार करून निष्पाप पर्यटकांना ठार मारले. संपूर्ण देश आणि जगभरात या कृत्याचा अत्यंत तीव्रपणे निषेध करण्यात आला. संतापाची लाट उसळली. दहशतवाद्यांना पाठीशी घालणाऱ्या पाकिस्तानला भारतीय लष्कराने जोरदार चपराक लावावी अशी मागणी देशपातळीवर होऊ लागली. या पार्श्वभूमीवर भारतीय सैन्यदलाने ‘ऑपरेशन सिंदूर’ ही मोहीम हाती घेतली आणि पाकिस्तानमधील प्रमुख दहशतवादी तळ, यंत्रणा उद्ध्वस्त केली. पाकला ‘जोर का झटका’ देणाऱ्या या मोहिमेच्या भविष्यकालीन परिणामांवर टाकलेला हा दृष्टिक्षेप....