
GST Rate Cut
esakal
सुनील चावके
जागतिक अर्थव्यवस्थेतील अनिश्चिततेच्या काळातही देशांतर्गत उपभोगात दहा टक्क्यांच्या आसपास वाढ नोंदविली जात असल्याचे मोदी सरकारचे म्हणणे आहे. ही अनिश्चितता आणि अमेरिकेचे आयातशुल्कास्त्र या आव्हानांमुळे भारताला आपली सुप्त शक्तिस्थाने ठळक करण्याची संधी लाभली आहे.
स तत वाढणाऱ्या सोन्या-चांदीच्या भावातून प्रतिबिंबित होत असलेली जागतिक अर्थव्यवस्थेतील अनिश्चितता तसेच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेल्या ५० टक्के आयातशुल्काचे सावट कायम असूनही यंदा नवरात्र आणि दिवाळीच्या मोसमात भारतीय बाजारपेठेत खरेदीला उधाण आले आहे. यंदाच्या सणासुदीच्या मोसमाच्या निमित्ताने अमेरिकेच्या आयातशुल्कास्त्राला निष्प्रभ करण्याची भारतीय बाजारपेठेत असलेली अंगीभूत क्षमतेची झलक ट्रम्प आणि अवघ्या जगास बघायला मिळाली आणि अस्थिर वैश्विक अर्थकारणामुळे उद्भवलेल्या संकटामध्ये भारताला आपली सुप्त शक्तिस्थाने ठळक करण्याची संधी लाभली.