
Maratha OBC reservation
esakal
छगन भुजबळ
मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारने जीआर काढल्यामुळे कोणाच्या आरक्षणावर परिणाम होणार नाही, असे आश्वासन देण्यात येत आहे. मात्र, एवढा मोठा समाज ओबीसी प्रवर्गात आल्यानंतर, त्याचा सर्वांवरच परिणाम होणार आहे. त्यामुळे जीआरच्या सुधारणांसाठी न्यायालयात दाद मागणार आहोत. अन्यथा, दस्तावेज तयार झाल्यानंतर त्याला आक्षेप घेतला नाही, तर पुढील पिढ्या आम्हाला प्रश्न विचारतील.
मराठा समाजाला ओबीसीमध्ये आरक्षण देण्याच्या मागणीनंतर, राज्य सरकारने जीआर काढले आहेत. त्यातून कोणत्या समाजाचे आरक्षण काढून दुसऱ्या समाजाला देणार नाही, अशी भूमिका सरकारने घेतली असली, तरीही त्याचा परिणाम ओबीसी आरक्षणावर होणार आहेच.