ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्ममुळे खरंच सिनेमाचा खप कमी होतोय का? या प्रश्नावर अनेकदा चर्चा होते. सध्या हिंदी चित्रपटसृष्टी विदेशी आणि दक्षिण भारतीय चित्रपटांच्या तुलनेत कमी पडताना दिसत आहे. मोठे स्टार्स, जोरदार प्रमोशन आणि भरमसाठ बजेट असूनही अनेक हिंदी चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालत नाहीत. यामागचं एक मुख्य कारण-'चित्रपट थिएटरमध्ये आल्यानंतर लगेच ८ आठवड्यांच्या आत ओटीटीवर येतात' असं दिलं जातं. यामुळे लोक विचार करतात, 'थिएटरमध्ये जाऊन पैसे कशाला खर्च करायचे, घरीच ओटीटीवर पाहू!'
पण खरंच लोकांना ही '८ आठवड्यांची मर्यादा' (OTT विंडो) माहीत आहे का? आणि यामुळे खरंच लोक थिएटरमध्ये जाणं टाळतात का? हे समजून घेण्यासाठी 'ओरमॅक्स' (Ormax) या संस्थेने एक अभ्यास केला आहे. या अभ्यासातून काय समोर आलंय, ते सविस्तर वाचा ‘सकाळ प्लस’ च्या या लेखात...