
नरेंद्र साठे
मे महिन्यामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे या वर्षीचा खरीप हंगाम पूर्वमशागतीविना होत आहे. पुणे विभागातील पुणे, अहिल्यानगर आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये पेरण्यांना सुरुवात झाली असली, तरी कृषी विभागाच्या समोर बोगस खत, बियाणे विक्री करणाऱ्यांना रोखण्याचे आव्हान आहे.
पुणे विभागात प्रामुख्याने सोयाबीन, बाजरी, भात, भात मूग, उडीद, मका यासह इतर पिके घेतली जातात. त्यासाठी शेतीची पूर्वमशागत अतिशय गरजेची असते. यावर्षी नेमके मेमध्ये झालेल्या पावसाने शेतीची मशागत झाली नाही.