
डॉ. हमीद दाभोलकर
इसवीसन दोन हजार नंतर जन्मलेल्या पिढीला ‘जेन झी’ म्हटले जाते. ती ‘चिंताग्रस्त पिढी’ बनलेली दिसते. हा गंभीर प्रश्न असून उमलत्या वयातल्या मानसिक आरोग्याच्या प्रश्नाचे आव्हान परतवून लावण्यासाठी ‘जेन झी’च्या खांद्याला खांदा लावून आपण सर्वांनी प्रयत्न करायला हवेत.
देशभरातील वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर ‘मानसिक आरोग्य’ हा बातमीचा विषय व्हावा, ही दुर्मीळ घटना मागच्या आठवड्यात घडली! निमित्त होते सर्वोच्च न्यायालयाने युवकांच्या मानसिक आरोग्याविषयी जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे.