
डॉ. केशव साठये
परस्परातील बंधुभाव वाढवण्यासाठी समाजमाध्यमांचा वापर अपेक्षित असताना अनेकवेळा ट्रोलिंग, भडक भाषा, द्वेषमूलक ताशेरे यांचा भडिमार यांसाठी होऊ लागला. माध्यमवापराच्या विवेकाअभावी इतरही अनेक दुष्परिणाम घडताहेत. सर्वोच्च न्यायालयाने कालच(ता.१४ जुलै) समाजमाध्यमांच्या वापराविषयी मार्गदर्शक तत्त्वे जारी करणार असल्याचे म्हटले आहे.
कविसाव्या शतकाची पहिली पंचविशी आता लवकरच संपेल. या अडीच दशकाच्या तारुण्यकाळाचा आढावा घेतला तर एक लक्षात येते की, तंत्रज्ञानात आपण वेगाने प्रगती केली. डिजिटल विश्व आणि विशेषतः समाजमाध्यमे जगण्याचा अविभाज्य भाग बनली.