
डॉ. श्रुती पानसे
पहिलीपासून तिसरी भाषा शिकविण्याच्या सरकारच्या निर्णयावरून खूप चर्चा झाली. प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचे वय लक्षात घेता, मातृभाषेशिवाय अन्य भाषा शिकण्याचा बोजा त्या मुलांवर पडणार होता. त्याऐवजी बालकेंद्रित शिक्षणावर भर देण्याची गरज असून, त्याचा विचार करायला हवा.
मूल जन्माला येते, तेव्हा त्याच्या मेंदूतील भाषा शिक्षणाची यंत्रणा ही तयार झालेली असते. ज्या-ज्या भाषेचे शब्द त्याच्या कानावर पडतात त्याप्रमाणे ते भाषा ऐकायला आणि बोलायला शिकत असते. मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकासामध्ये भाषा हा घटक अतिशय महत्त्वाची भूमिका पार पाडत असतो.