
कल्याणी शंकर
अमेरिकेतील विद्यापीठांमध्ये परदेशी विद्यार्थ्यांना ट्रम्प प्रशासनाने बंदी घातल्यानंतर विद्यापीठे व शिक्षणसंस्था अडचणीत सापडल्या आहेत. हे सत्र असेच सुरू राहिले, तर अमेरिकेतील विद्यापीठांची प्रतिमा नक्कीच ढासळेल. ट्रम्प प्रशासन धोरण कठोर करीत असताना विद्यापीठांनाही प्रतिमा सांभाळण्यासाठी प्रयत्न करावे लागतील.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दुसरा कार्यकाळ विविध कारणांनी गाजत आहे. अनेक धाडसी निर्णय, आयातशुल्कात वाढ, मस्क यांच्यासह वादंग अशा सर्व मुद्द्यांमध्ये एक महत्त्वाचा मुद्दा आहे तो, ट्रम्प आणि विद्यापीठांधील वादाचा.