
उमेश शेळके
‘ईझ ऑफ लिव्हिंग’ आणि ‘नगर नियोजन’ या दोन्ही गोष्टी एकमेकांना पूरक आहेत. या दोन्हीमध्ये समन्वय नसेल तर शहरे बकाल होतात. सर्वाधिक नागरीकरण होणारे राज्य म्हणून महाराष्ट्राकडे पाहिले जाते. या राज्यात एकूण लोकसंख्येच्या ५० टक्के लोक ५०० शहरांमध्ये राहतात. तर ५० टक्के लोकसंख्या ही ४० हजार गावांमध्ये राहते.
किमान शहरांचे नियोजन करून ती सुधारण्यावर भर दिला, तर राज्यातील किमान ५० टक्के जनतेला उत्तम प्रकारचे जीवनमान देऊ शकतो. उशिरा का होईना त्या दृष्टीने केंद्र आणि राज्य सरकारने पावले पडू लागली आहेत. मात्र, त्यात दिरंगाई झाल्यास ही शहरे कोलमडतील.