
सुनील पाटील, कोल्हापूर
यंदा एप्रिल-मे महिन्यात झालेल्या पावसाचा परिणाम खरीप व रब्बी हंगामावरही होणार आहे. सतत सुरू असणाऱ्या पावसामुळे आतापर्यंत कमी प्रमाणात पेरण्या झाल्या आहेत. त्यामुळे धान्य व कडधान्य उत्पादनावर परिणाम होणार आहे. तसेच, खतांच्या लिंकिंगवरूनही शेतकऱ्यांची लूट होत असल्याचा आरोप होत आहे.
अवकाळी, वळीव आणि मॉन्सूनपूर्व पावसाने कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्याला झोडपून काढले आहे. प्रत्येक वर्षी एप्रिल, मे आणि जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पिण्यासाठी, शेती व उद्योगासाठी पाण्याचा पुरवठा काटकसरीने करावा लागत असतो.