
संजय कुमार
‘वक्फ सुधारणा विधेयका’ला संसदेची मंजुरी मिळून, त्याचे कायद्यात रूपांतरही झाले आहे. संयुक्त जनता दलाच्या काही नेत्यांचे राजीनामे आणि मुस्लिम समुदायातील अस्वस्थतेचा विपरीत परिणाम राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा घटक पक्ष संयुक्त जनता दलाच्या व भाजपच्या युतीवर होईल का, या चर्चेला तोंड फुटले आहे. आकडेवारीवरून मात्र स्पष्ट दिसते, की बिहार निवडणुकीत ‘एनडीए’वर त्याचा प्रतिकूल परिणाम होऊ शकत नाही.
वक्फ सुधारणा विधेयका’ला संसदेची मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे त्याचे कायद्यात रूपांतरही झाले आहे. मात्र, त्यामुळे देशभरातील मुस्लिम नेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. त्याविरोधात विविध विरोधी राजकीय पक्षांकडून तीव्र प्रतिक्रियाही उमटल्या आहेत. बिहारमध्ये आणि केंद्रातही सत्तेत असलेल्या संयुक्त जनता दलाच्या (जेडीयू) काही नेत्यांनी राजीनामे दिले आहेत. हे राजीनामे आणि मुस्लिम समुदायातील अस्वस्थतेचा विपरीत परिणाम राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा घटक पक्ष संयुक्त जनता दलाच्या व भाजपच्या युतीवर होईल का, या चर्चेला तोंड फुटले आहे. कारण वर्षअखेरीस बिहारमध्ये होणाऱ्या निवडणुकीत या दोन पक्षांची युती अपेक्षित आहे. मात्र, आता त्याबाबत उलटसुलट शक्यता व्यक्त होत आहेत.