२ एप्रिल २०२५ रोजीचा दिवस देशभरात एकाच विषयावरून गाजला.. केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरण रिजिजू यांनी लोकसभेत वक्फ (सुधारणा) विधेयक, २०२५ सादर केले. हे विधेयक वक्फ कायदा, १९९५ मध्ये काही बदल करण्यासाठी आणलेलं होतं.
वक्फ (सुधारणा) विधेयक, 2025 ने बुधवारी रात्री, 12 तासांपेक्षा जास्त झालेल्या चर्चेनंतर लोकसभेत बहुमताने मंजुरी मिळवली. या चर्चेत सरकार आणि विरोधी पक्ष यांच्यात जणू कसोटीचा सामनाच झाला. सदनाने या विधेयकाला 288 मतांनी मंजुरी दिली.
वक्फ बोर्डाच्या ताब्यात असलेल्या जमिनी आणि मालमत्तांचे व्यवस्थापन कसं करायचं या मध्ये बदल प्रस्तावित होते. यामुळे देशात धार्मिक जमिनी आणि त्यांच्या व्यवस्थापनावरून पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे. पण हे वक्फ म्हणजे काय, ते कसं काम करतं, सुधारणा विधेयकातले बदल काय, इतर धर्मांबद्दल असे काही कायदे आहेत का आणि हिंदू मंदिरांवरील सरकारी नियंत्रणाचा इतिहास काय? वाचा सकाळ प्लस च्या या लेखात...