
कल्याणी शंकर
वादग्रस्त वक्फ सुधारणा विधेयकाच्या मंजुरीनंतर मोदी सरकारने गेल्या वर्षी मंजूर केलेला ‘वक्फ’हूनही अधिक वादग्रस्त असलेली समान नागरिक संहिता (यूसीसी) अंमलात आणण्याचा मनोदय व्यक्त केला आहे. वक्फ विधेयकावर सुरू असलेल्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर, ‘यूसीसी’चा मुद्दा पुढे रेटण्यासाठी हा योग्य काळ आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. ‘यूसीसी’विरोधात होणारी आंदोलने आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी या कायद्याच्या अंमलबजावणी आधी त्यावर व्यापक सहमती होणे फार गरजेचे आहे. सर्वसमावेशक संतुलित दृष्टिकोन हाच या मुद्द्यावर पुढे जाण्याचा एकमेव मार्ग आहे.