प्रा. शहाजी मोरे
पृथ्वीवरील सजीव सृष्टीस, भावी पिढ्यांना वाचवायचे असेल तर चाकोरीबद्ध उपायांऐवजी फलद्रुप होणारे पर्याय शोधून ते त्वरित अंमलात आणले पाहिजेत. त्या दृष्टीने एस. आर. एम. तंत्रे फलद्रुप होण्यासाठी शास्त्रज्ञ, राज्यकर्ते, नागरिक यांनी एकत्र येऊन जागतिक तापमानवाढ रोखणे गरजेचे आहे.
जागतिक तापमानवाढीने इतके भयंकर रूप धारण केले आहे की, तो विषय फक्त अभ्यासापुरता मर्यादित न राहता त्याचे चटके प्रत्यक्ष अनुभवायला येत आहेत. खरी होरपळ यापुढे सुरु होणार आहे. याचे कारण ‘जागतिक हवामान संघटने’ने गंभीर इशारा दिला आहे की, येत्या पाच वर्षांत जगाचे तापमान औद्योगिक पर्वापूर्वीच्या तापमानापेक्षा दोन अंश सेल्सियसने वाढणार आहे, म्हणजेच धोक्याची ‘तांबडी रेषा’ ओलांडणार आहे.