
राहुल गडपाले
rahulgadpale@gmail.com
गेल्या काही शतकांमध्ये भावनिक बुद्धिमत्तेच्या बाबतीत माणूस नीचांकी पातळीवर घसरताना दिसतो आहे. स्वतःच्या आणि इतरांच्या भावना ओळखणे, समजून घेणे, नियंत्रित करणे हळूहळू कमी होताना दिसते. आयक्यू, ज्याला आपण बौद्धिक बुद्धिमत्ता असे म्हणतो, त्याचे मोजमाप बुद्ध्यांकाने करता येऊ शकते.
कारण त्यात गणना, तर्क, अनुमान आणि विश्लेषणावर भर असतो. शिवाय ही बुद्धिमत्ता तुलनेने स्थिर मानली जाते. भावनिक बुद्धिमत्तेत मात्र भावना, सहानुभूती, नातेसंबंधांचा अंतर्भाव असतो. ही बुद्धिमत्ता आपण इतरांकडूनही आत्मसात करू शकतो. शिवाय सर्वात महत्त्वाचे म्हणजे या बुद्धिमत्तेचा स्वीकार करणारे ८० टक्के लोक यशस्वी गणले जातात, असे मानसशास्त्रज्ञ डॅनियल गोलमन सांगतात.