Premium| Devrai: सर्वोच्च परिसंस्था!

Ancient Cultural Treasure: महाराष्ट्रातील देवराईचे संरक्षण अत्यंत आवश्यक आहे. यामुळे जैवविविधता आणि पारंपरिक संस्कृती जपली जाते.
Sacred Grove Preservation
Sacred Grove Preservationesakal
Updated on

श्री. द. महाजन

जवळजवळ सत्तर वर्षं होऊन गेली त्याला... मी पहिली देवराई पाहिली १९५६मध्ये. त्यापूर्वीच मी जंगलात भ्रमंतीला, अभ्यास सहलींना सुरुवात केलीच होती. पुण्याहून पौड रस्त्याने पुढे मुळशीपर्यंत बरा रस्ता होता. मुळशीच्या पुढे पश्चिमेकडे वळून जलाशयाच्या वरच्या बाजूने काही अंतरावरून जाणारा रस्ता कच्चा होता.

आम्ही जीप सोडून चालत निघालो. वाटेत मुळा नदीवरचा कच्चा पूल ओलांडला. बऱ्यापैकी झाडी होती. दीड-दोन तास चालल्यानंतर अतिशय घनदाट जंगल लागले. ती होती नांदिवलीची देवराई! समोर एक छोटासा लांबट गुळगुळीत, शेंदूर लावलेला पाषाण दिसला. शेजारी छोटी घंटा टांगलेली, समोर मातीची मोठी पणती होती.

देवरायांना मिळालेल्या संरक्षणामुळे तेथील परिसंस्था शिखर परिसंस्था (Climax Ecosystem) प्रकारची असते. ज्या प्रदेशात देवराई असेल त्या प्रदेशातील पर्यावरणानुसार सर्वोच्च प्रकारची नैसर्गिक अवस्था तेथे उत्क्रांत झालेली व टिकून राहिलेली दिसते. म्हणजे त्या त्या ठिकाणचे हवामान, पर्जन्यमान, जमिनीचा मगदूर इत्यादी सर्व पर्यावरणीय घटकांमध्ये त्यातल्या त्यात अधिक दाट वनश्री निर्माण झालेली असते.
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com