Premium|Udgir Fort History : शेकडो वर्षांच्या संघर्षाचा साक्षीदार; उदगीर किल्ल्याचा यादव काळापासूनचा गौरवशाली इतिहास

Maratha History and Forts : १७६० च्या ऐतिहासिक लढाईत मराठ्यांनी निजामाचा धुव्वा उडवत उदगीरचा अभेद्य भुईकोट जिंकला असून, यादव काळापासून चालुक्यांपर्यंतच्या वैभवशाली इतिहासाचा आणि विविध राजवटींच्या संघर्षाचा हा दुर्ग आजही साक्षीदार आहे.
Maratha History and Forts

Maratha History and Forts

esakal

Updated on

हैदराबादचा निजाम मराठवाड्यातील प्रजेचा छळ करत हाेता. त्याचा कायमचा बंदाेबस्त करण्यासाठी मराठ्यांनी त्याच्याविरुद्ध माेहीम आखली. मराठा आणि निजामाची उदगीर येथे घनघाेर लढाई झाली. यात मराठ्यांनी माेठा पराक्रम गाजवला. निजामाचा दारुण पराभव झाला. या लढाईत प्रामुख्याने मल्हारराव हाेळकर, जनकाेजी शिंदे, तुकाेजी हाेळकर, सदाशिवभाऊ पेशवे आदींनी माेठा पराक्रम गाजवला.

मराठा-निजामाची १७६०च्या फेब्रुवारीत उदगीर येथे लढाई झाली. या लढाईत निजामाचा दारुण पराभव झाला. मराठ्यांचा विजय झाला. भुईकाेट उदगीर मराठ्यांनी जिंकून घेतला. मराठ्यांनी जिंकलेला भुईकाेट उदगिर हा प्राचीन दुर्ग आहे. हा यादव, काकतीय, बहमनी, बरीदशाही, निजामशाही, आदिलशाही, माेगल आणि हैदराबादचा निजाम यांच्या सत्तासंघर्षाचा साक्षीदार आहे. विशेषतः यादव आणि काकतीय यांच्या सीमेवरील हा महत्त्वाचा गड हाेता. त्यामुळे यादव आणि काकतीय यांचा सतत संघर्ष चालत असे. त्यामुळे यादवकाळात उदगीर या गडाला महत्त्वाचे स्थान हाेते. तेराव्या शतकात हाेऊन गेलेला (इ.स. १२१० ते १२४६) यादव राजा दुसरा सिंघण याच्या कारकिर्दीत अंबादेश या विभागातील उदगीर गड हे महत्त्वाचे स्थान हाेते. यादवांच्या राजवटीत खाेलेश्वर हा महत्त्वाचा सेनापती हाेता. त्याचा बीड जिल्ह्यातील अंबाजाेगाई येथे एक महत्त्वाचा शिलालेख आहे. त्यांच्या शिलालेखात ‘उदगीर’ या गडाचा उल्लेख आलेला आहे. यादव आणि काकतीय यांची सीमा ही ‘उदगीर गड’ हाेती.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com