

Deenanath Mangeshkar Biography
esakal
हृदयनाथ मंगेशकर - saptrang@esakal.com
पंडित दीनानाथ गुरुजींच्या घरातून निघाले. वाटेत ते चकव्यात सापडले; मात्र त्यांना तिथे एक गृहस्थ भेटले, कोण होते ते गृहस्थ. सारेच विलक्षण. त्या एका प्रवासात दीनानाथ यांनी काय नाही अनुभवले. हा प्रवास पंडितजी सांगत आहेत, जो त्यांना त्यांच्या लतादीदींनी सांगितला.
बोलता बोलता पंडितजी नाहीसे झाले.
मी शून्यात पाहत उभा राहिलो.
पण हे शून्य निर्विकार नव्हते. त्या शून्यात
फोलपणा किवा पोकळपणा नव्हता.
एक शाश्वत आश्वासन, एक दृढ विश्वास,
एक नाव, गाव, नसलेला संकेत होता.
‘‘मी तुझं आत्मरूप आहे, दीना!’’
हा तो अनाम संकेत,पंडितजी देऊन गेले होते.
‘‘पंडितजी! तुम्ही संकेत देऊन नाहीसे झालात.
तुम्ही अदृश्य आत्मरूप आहात,
पण मी सदृश्य आहे, सदृश्य शरीररूप आहे.
प्रज्ञावंतांना पडलेला, पण त्यांनाही न
सोडविता आलेला प्रश्न ! ‘मी’