AI in Research: एआयच्या युगात विज्ञानाची कसोटी; ‘कृत्रिम विज्ञान’, पीअर रिव्ह्यू आणि विश्वासाच्या ढासळत्या भिंती

Original content: एआयवर वाढत्या अवलंबित्वामुळे वैज्ञानिक लेखन, परीक्षण आणि निर्णयप्रक्रियेत मानवी विचारशक्ती व सखोलतेचा ऱ्हास
originality lossed

originality lossed

Esakal

Updated on

डॉ. किशोर पाकणीकर

विज्ञानाने अनेक बदलांना सामोरे जाऊन स्वतःला जुळवून घेतले आहे. मात्र सध्याचा बदल वेगळा आहे, कारण तो ज्ञान तपासण्याच्या प्रक्रियेवर परिणाम करतो.

अलीकडे विज्ञानातील संशोधनलेखनाच्या क्षेत्रात दोन घटना घडल्या आहेत, ज्या आपल्याला गंभीर विचार करायला भाग पाडतात. एका प्रकरणात, `पीअर रिव्ह्यू’दरम्यान ‘आर्टिफिशिअल इंटलिजन्स’ (एआय) ने तयार केलेला मजकूर आढळला आणि त्या लेखांना नियतकालिकात प्रसिद्धीसाठी नकार देण्यात आला. दुसऱ्या प्रकरणात, पूर्णपणे ‘एआय’ने लिहिलेला एक लेख ‘पीअर रिव्ह्यू’ पार करून नियतकालिकात प्रसिद्ध झाला. या दोन घटना एकत्र पाहिल्यास, विज्ञान कसे तयार होते आणि त्याचे मूल्यमापन कसे केले जाते, यात लक्षणीय बदल घडू लागल्याचे दिसते.

पहिल्यांदाच ‘एआय’ केवळ सहाय्यक म्हणून नाही, तर संपूर्ण वैज्ञानिक प्रक्रियेत लेखनापासून ते मूल्यमापनापर्यंत सक्रिय भूमिका बजावू लागली आहे. यामुळे एक मूलभूत प्रश्न समोर येतो. अनेक वर्षांपासून आपण वैज्ञानिक नियतकालिकांत छापलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवत आलो आहोत. हा विश्वास या गृहितकावर आधारित आहे की, छापलेला मजकूर तज्ज्ञांच्या तपासणीतून गेलेला असतो. हा विश्वास आजही तितकाच योग्य आहे का?

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com