

Naxal Free India
esakal
डॉ. रामानंद एन. गर्गे
‘नक्षलमुक्त भारत’ हा ऐतिहासिक क्षण म्हणजे केवळ नक्षलवादाचा अंत अथवा केवळ एक ‘सुरक्षा अभियान’ नसून, तो एक ‘सामाजिक आणि मानसिक’ विजय आहे. बहुआयामी लोकाभिमुख विकासाद्वारे लाल सलामच्या जाचक दहशतीचा अंत करून ‘जय हिंद’च्या विकासारूपी लोकशाहीवर विश्वास दृढ करणाऱ्या ‘एकात्मिक भारत’या संकल्पनेचे दृढनिश्चयी दर्शन घडत आहे. भारताच्या आकांक्षापूर्तीची ही नांदी आहे.
गेल्या दशकाहून अधिक काळ देशाला यशस्वी निर्णायक प्रशासन देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा या दोघांनी भारताच्या सुरक्षाविषयक आव्हानांच्या प्रश्नपत्रिकेतील प्रमुख तीन सुरक्षाविषयक आव्हाने निर्णयात्मक नेतृत्व, कुशल मुत्सद्देगिरी आणि प्रभावी परिवर्तनात्मक विकास या त्रिसूत्रींच्या आधारे केवळ उत्कृष्टपणे हाताळलीच नाहीत, तर त्यावर निर्णयात्मक विजय संपादन करून जगातील सगळ्यात विशाल अशा लोकशाहीची पाळेमुळे अजूनच सुदृढ केली आहेत.