

Artificial Intelligence innovation in India
esakal
ब्रिजेश सिंह
दिल्लीतील शिखर परिषदेने स्पष्ट संदेश दिला आहे, की भारत आता जगाचा ‘आयटी सर्व्हिस हब’ राहिला नसून तो ‘एआय इनोव्हेशन लीडर’ बनला आहे. आपण आता जगासाठी नियम आणि निकष ठरवत आहोत. जगातील मोठ्या कंपन्या भारतात आपली संशोधन केंद्रे उघडत आहेत.
‘इंडिया एआय इम्पॅक्ट समिट’ म्हणजे केवळ एका तांत्रिक इव्हेंटची सांगता नव्हती; तर ती एका नव्या, समर्थ आणि ‘डिजिटलदृष्ट्या स्वतंत्र’ भारताची नांदी होती. जगाचे ‘बॅक ऑफिस’ म्हणून ओळखला जाणारा भारत आता जगाचे ‘फ्रंट ऑफिस’ बनला आहे. आपण आता पाश्चात्त्य कंपन्यांच्या सॉफ्टवेअरमधील चुका दुरुस्त करण्यापुरते मर्यादित नाही; तर भविष्यातील तंत्रज्ञानाचा मेंदू स्वतः घडवत आहोत.