

India Air Pollution and Public Health
esakal
अतुल देऊळगावकर - sakal.avtaran@gmail.com
जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांच्या यादीत भारतातील शहरांची मोठी संख्या असणे, ही केवळ पर्यावरणीय चिंतेची बाब नाही; तर देशाच्या सार्वजनिक आरोग्यापुढील गंभीर धोक्याची घंटा आहे. हवेत मिसळणारे पी. एम. २.५ चे अतिसूक्ष्म कण श्वासावाटे थेट फुप्फुसांपर्यंत पोहोचत आहेत आणि कोट्यवधी लोकांच्या आरोग्याला धोका निर्माण करत आहेत. प्रदूषणामुळे नागरिकांचा श्वास कंठाशी आला असताना विकासाच्या या वाटचालीचा
अथांग काळ्याभोर अवकाशातील निळा ठिपका. थोडं जवळ गेलं, की त्याच्या भोवताली असलेलं धुरकट जाळं दिसतं. बाद झालेले उपग्रह, रॉकेटचे तुकडे असा १० लाख तुकड्यांचा तो संसार. सूर्यप्रकाशात चकाकणारं ते कचऱ्याचं कडं, ताशी २८ हजार किलोमीटर वेगाने गरागरा फिरतंय. ते ओलांडून आपण खाली निघालो, की दिसतो, अतिनील किरणांना थोपवणारा फिकट निळ्या रंगाचा ओझोनचा थर. आपण तिथून पुढे निघतो. आता निळा ठिपका मोठा झालेला असतो. मग येतं पांढऱ्या रंगछटांच्या ढगांचं राज्य. त्यात मध्येच कधीतरी दिसणारे काळे करडे ढग... तर कधी तशा दाट कृष्णमेघांचे पर्वत. त्यांना सोडून आपण आणखी खाली येतो. निळा ठिपका जरा अस्पष्ट झालेला असतो. त्याचं कारण, त्याच्याभोवती पसरलेलं राखाडी-तपकिरी धुरकट हवेचं कवच आणि त्यात नांदणारे कार्बनडाय ऑक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड आणि अतिसूक्ष्म धुळीकण. हा आहे सिंधू-गंगा नदीचा विस्तीर्ण मैदानी प्रदेश! काळ्या-करड्या धुरांत बुडून जाणं ही केवळ ‘दिल्ली राजधानी क्षेत्रा’ची नव्हे; तर पूर्ण देशाची समस्या आहे.
अमेरिकेची ‘नासा’, दिल्लीची ‘आय. आय. टी.’ आणि स्वित्झर्लंडमधील ‘आय. क्यू. एअर.’ या सर्व संस्थांचं निरीक्षण आणि विश्लेषण असंच आहे.